शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (10:34 IST)

दोनच मुलं जन्माला घालण्याचा नियम करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने दोनच मुलं जन्माला घालण्याचा नियम करावा, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला प्रतिवादी बनवण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे.
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शुक्रवारी (7 मे) यासंदर्भात निर्देश दिले आहेत. ही याचिका भाजप नेते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केली आहे. यामध्ये गृहमंत्रालयाऐवजी आरोग्य मंत्रालयाला प्रतिवादी बनवण्याची मागणी करण्यात आली होती. सदर याचिकेवरील पुढील सुनावणी 5 जुलै रोजी होणार आहे