बिहारमध्ये उड्डाणपुलाखाली अडकले विमान
बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ओव्हरब्रिजखाली विमान अडकल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यावर संपूर्ण गोंधळ निर्माण झाला. हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. गर्दीमुळे राष्ट्रीय महामार्गवर वाहतूक ही 3 ते 4 तास ठप्प झाली होती.
विमानाचे काही अवशेष घेऊन माल वाहतूक ट्रक घेऊन आसामला नेत असताना ट्रक फ्लायओव्हरच्या खाली अडकला. हे संपूर्ण प्रकरण बिहारच्या मोतीहारीच्या NH28 पिपराकोठी ओव्हरब्रिजचे आहे. लोकांना ही बाब समाजतातच लोकांनी विमान बघण्यासाठी गर्दी केली. काही लोक सेल्फी घेऊ लागले. मिळालेल्या माहितीनुसार, एका मोठ्या ट्रक लॉरीमध्ये विमानाची वाहतूक केली जात होती. ओव्हरब्रिजमध्ये विमान अडकल्याची बातमी समजताच आजूबाजूच्या लोकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. अनेक लोक पुलावर अडकलेल्या विमानाचे फोटो आणि सेल्फी काढण्यात व्यस्त होते, तर पोलीस ओव्हरब्रिजच्या खाली एका लॉरीवर ठेवलेले विमान कसेतरी काढण्याचा प्रयत्न करत होते.
त्यानंतर ट्रक लॉरीचे सर्व टायरची हवा काढून ओव्हरब्रिजखाली अडकलेल्या विमानाला अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. लोकांनी आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
Edited By- Priya DIxit