पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी भासवून केली स्कीईंग पॉइंटची पाहणी, तोतयास अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याचचं भासवणाऱ्या तोतयाला पोलिसांनी अटक केली आहे.किरण पटेल असं या तोतयाचं नाव असून 2 मार्च रोजी काश्मीर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.चौकशीनंतर दुसऱ्या दिवशी (3 मार्च) पटेल यांच्यावर अटकेची कारवाई केल्याची माहिती प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) दिली आहे.पोलिसांनी त्यांच्यावर फसवणूक आणि तोतयागिरी संदर्भातील गुन्हा दाखल केला आहे.
या माध्यमातून पटेल हे आर्थिक आणि भौतिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत होते, असं पोलिसांकडून दाखल तक्रारीत म्हटलं आहे.
किरण पटेल यांना गुरुवारी (16 मार्च) न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, किरण पटेलचं व्हेरीफाईड (ब्लू टिक) ट्विटर अकाऊंट आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
शिवाय, पटेल यांच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रॅम अकाऊंटवर त्यांनी अनेक फोटोही अपलोड केलेले आहेत.
यामध्ये, सुरक्षा रक्षकांनी वेढलेल्या काश्मीरला कार्यालयीन भेटीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.
PTI च्या माहितीनुसार, एका दौऱ्यात त्यांना सरकारने दक्षिण काश्मीरमधील सफरचंद बागांसाठी खरेदीदार पाहण्यास सांगितलं होतं, असा त्यांनी दावा केला.
दुसऱ्या एका भेटीत त्यांनी लोकप्रिय गुलमर्ग येथील सुप्रसिद्ध स्कीईंग पॉईंटची पाहणी केली. शिवाय, सरकारने त्यांना या भागातील सुधारणाविषयक कामाची जबाबदारी दिली आहे, असंही त्यांनी म्हटलं.
काश्मीरमध्ये किरण पटेल यांना प्रशासनाकडून सर्वोच्च स्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली होती. तिथे त्यांनी बुलेटप्रूफ कारमध्ये प्रवास केला. तसंच भेटीदरम्यान पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत निवासस्थानी मुक्कामही केला होता.
मात्र, आता त्याच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं सुरक्षा रक्षकांना आढळून आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Published By- Priya Dixit