सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (09:38 IST)

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला प्रथम २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार,नंतर राजदूत देणार भेट

कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत आहे. यामुळेच हे सर्व राजदूत २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येऊन सीरम आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देणार होते. दरम्यान राजदूत येणार म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील २८ नोव्हेंबरला भेट देणार म्हणून प्रशासनाकडून प्रचंड तयारी सुरू होती. परंतू राजदूत येऊन गेल्यानंतर पंतप्रधान येणे योग्य नसल्याने प्रथम २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.  या संदर्भातील मोदी यांचा प्राथमिक दौरा आला असून, अंतिम दौरा अद्याप आला नाही.  यामुळेच राजदूत यांचा दौरा आता २७ नोव्हेंबर ऐवजी ४ डिसेंबर करण्यात आला आहे.  
 
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आलेल्या दौऱ्यानुसार ४ डिसेंबर रोजी दिल्ली येथून एअर फोर्सच्या विमानाने ९८ देशांचे राजदूत लोहगाव विमानतळाच्या टेक्निकल एरिया येथे १०-१५ वाजता दाखल होणार आहेत. तर, रशिया आणि सौदी अरेबियाचे राजदूत मुंबईहून पुण्यात येणार असून, याचा अंतिम दौरा अद्याप आला नाही. त्यानंतर दोन गटामध्ये हे राजदूत प्रथम सीरम आणि जिनोव्हा कंपनीला भेट देणार आहेत. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी रात्री ८-१५ वाजता पुन्हा विशेष विमानानेच दिल्लीला रवाना होणार आहेत.