1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (08:52 IST)

शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचा समावेश

pulwama
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राचाही समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील सीआरपीएफ जवान राहुल करांडे हे पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. राहुल करांडे हे विठुरायाची वाडी गावचे आहेत. सांगली जिल्ह्यावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. 
 
सीआरपीएफच्या माहितीनुसार, रस्त्यावर एका चारचाकी गाडीमध्ये IED बॉम्ब ठेवण्यात आला होता. कार महामार्गावर उभी होती. सुरक्षा जवानांच्या गाडीचा ताफा त्या कारजवळ आल्यानंतर लागलीच या कारमधील बॉम्बचा स्फोट झाला. यात 40 जवान शहीद झाले आहेत. तर इतर अनेक जवान जखमी झाले आहेत. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.