शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भाजपा आमदाराच्या दोन बायकांचे भांडण रस्त्यात झाले जिल्ह्यात चर्चेचा विषय

यवतमाळ येथील  भाजप आमदार राजू तोडसाम हे नेहमीच काही ना काही कारणामुळे वादात असतात हे नेहमीच दिसून आले आहे. अनेकदा त्यांचं चर्चेत राहण्याचे विषय राजकीय होते मात्र यावेळी जरा कारण वेगळे आहे.  यावेळी घरगुती भांडणामुळे ते जोरदार  चर्चेत आले.  बरं हे भांडण घरगुती म्हणजे घरात झालं असंही नाही. तर थेट भर रस्त्यावरच झाल आहे. 
 
भांडण अस की पूर्ण मतदारसंघाला माहिती पडल आणि सर्वांनी पाहिलं आहे. भांडणाचं कारणही असंय की, चर्चा तर होणारच. झालं असं की, आर्णी-केळापूर मतदरासंघातील भाजपचे आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांचं हे भाडण आहे. आमदार तोडसाम यांची पहिली बायको वेगळी राहते. आपल्याकडे राजू तोडसाम लक्षच देत नाहीत, राहतच नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या कारणामुळे दोन बायकांमध्ये भर रस्त्यावर जबर हाणामारी सुरु झाली.हा सर्व प्रकार कबड्डीच्या कार्यक्रमात झाला. 
 
कबड्डीचा सामना राहिला बाजूला या दोघींचेच भांडण प्रेक्ष्णाकाना पहायला मिळाले आहे. आमदार राजू तोडसाम यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरकवडामधील वाय पॉईंट येथे कबड्डीचे सामने ठेवले होते.  कबड्डी राहिली बाजूला. किंबहुना, कबड्डी पाहण्यासाठी आलेले लोक आमदार राजू तोडसाम यांच्या दोन बायकांची भांडणं पाहूनच परतली आहेत. आमदार राजू तोडसाम यांच्या समर्थकांनाही पहिल्या बायकोच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे हे भांडणं अधिकच वाढलं. नंतर पोलिस ठाण्यात हे भांडण मिटवणं सुरु होतं. मात्र, बायकांचं भांडणं ते, मिटतंय कसलं. त्यामुळे आमदार सध्या चर्चेत असून या भांडांनाची क्लिप बघ्यांनी ग=काढली असून ही क्लिप सोशल मिडीयावर जोरदार शेअर होत असून दोन बायका आणि फजिती ऐका अशी स्थिती आमदारांची झाली आहे.