1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (16:45 IST)

राहुल गांधी आणि अखिलेश यांनी हातात संविधान घेऊन घेतली शपथ

Akhilesh Yadav rahul gandhi
संसदेच्या अधिवेशनादरम्यान मंगळवारी लोकसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. विविध राजकीय पक्षांच्या खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

शपथविधी सोहळ्यात राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे दोघेही संविधानाची प्रत घेऊन व्यासपीठावर आले. राहुल गांधी यांनी राज्यघटनेची लाल रंगाची प्रत तर अखिलेश यादव यांनी निळ्या रंगाची प्रत घेऊन शपथ घेतली. 
 
राहुल आणि अखिलेश या दोघांनी लोकसभेत व्यासपीठावर येऊन संविधानासोबतच पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर राहुल गांधींनी जय हिंद आणि जय संविधानाच्या घोषणा दिल्या. काही वेळाने अखिलेश यादवही संविधानाची निळ्या रंगाची प्रत घेऊन शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर आले.आणि शपथ घेतली 

Edited by - Priya Dixit