शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (20:34 IST)

अदानी आणि अंबानीं बद्दलच्या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर राहुल गांधींचा घणाघात

rahul gandhi
अदानी आणि अंबानींबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर राहुल गांधींनी भाष्य केलं आहे.भ्रष्टाचाराच्या टेम्पोचा 'ड्रायव्हर' आणि 'मदतनीस' कोण आहे हे देशाला माहीत आहे, असे राहुल म्हणाले.
 
राहुल गांधींनी अधिकृत हँडलवर एक व्हिडिओ जारी केला याशिवाय राहुलने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, नमस्कार मोदीजी, घाबरले आहे. 

राहुल गांधी म्हणाले की, साधारणपणे तुम्ही अडाणी आणि अंबानींबद्दल बंद खोलीत बोलतात.प्रथमच तुम्ही सभेत त्यांचे नाव घेतले आहे. तुम्हाला हे माहित आहे की ते टेम्पोत पैसे देतात . हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? एक काम करा, त्यांच्याकडे सीबीआय ईडी पाठवा, पूर्ण चौकशी करा, लवकरात लवकर पूर्ण करा, मोदीजी घाबरू नका.

राहुल पुढे म्हणाले की, मी देशाला पुन्हा सांगत आहे की नरेंद्र मोदीजींनी या लोकांना जेवढा पैसा दिला आहे तेवढाच पैसा आम्ही देशातील गरीब जनतेला देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहेला नौकरी पक्का योजना, या योजनांच्या माध्यमातून आपण करोडो लोकांना करोडपती बनवू.
 
Edited By- Priya Dixit