मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राहूल गांधीच आता माझे बॉस : सोनिया गांधी

राहूल गांधीच आता माझे बॉस आहेत, याबाबत शंका उपस्थित करू नका, असे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेसच्या संसदीय बैठकीनंतर त्या बोलत होत्या. राहुल गांधी यांनी डिसेंबर २०१७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. आतापर्यंत राहुल यांची राजकीय वाटचाल माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या छत्रछायेखाली झाली. पण, राहुल अध्यक्ष झाल्यानंतर हे चित्रच पालटले आहे.  
 
गुजरातमध्ये कठिण परिस्थिती असताना देखील काँग्रेसने चांगले यश मिळवले. नुकतेच राजस्थान पोटनिवडणुकीत देखील चांगले यश मिळवले. हे यश ‘देशात आता बदलाचे वारे येणार’ हेच दर्शविते, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.  कर्नाटकमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली.