रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (13:03 IST)

राहुल गांधी यांनी दलित महिलेशी करावा विवाह: रामदास आठवले

आपल्या मजेशीर वक्तव्यांमुळे प्रसिद्ध केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे की त्यांनी आता विवाहबद्ध व्हावं आणि एखाद्या दलित महिलेशी लग्न करावे.
 
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला कृषी कायद्यांबाबत नुकतीच 'हम दो हमारे दो' अशी कोपरखळी मारली. त्यावरून आठवले यांनी राहुल गांधी यांना अशाच मिश्किल शब्दात उत्तर दिलं आहे.
 
रामदास आठवले म्हणाले की माझे चांगले मित्र राहुल हे सध्या 'हम दो हमारे दो' विषयी बोलत आहेत. हे घोषवाक्य कुटुंब नियोजनाबाबत वापरलं गेलं होतं. आता राहुल गांधी यांना 'हम दो हमारे दो' पाहिजे असतील तर त्यांनी लग्न केलं पाहिजे. तसेच त्यांनी दलित महिलेशी लग्न केलं, तर महात्मा गांधींनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लागेल. त्याच्या या पावलामुळे जाती निर्मूलनही होऊ शकेल तसेच सर्व तरुणांनाही एक दिशा मिळेल.
 
आठवले पुढे म्हणाले की केंद्र सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपयांची मदत करतं. राहुल गांधी यांना आम्ही या योजनेचाही लाभ मिळवून देऊ. त्यांनी दलित महिलेलाच जोडीदार म्हणून निवडावे असा सल्ला आठवले यांनी दिली.