मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (21:07 IST)

रामदास आठवले यांनी यंदाही बिबट्या दत्तक घेतला

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यंदाही बिबट्या दत्तक घेतला आहे. गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय राज्यमंत्री मुंबईतल्या बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बिबट्या दत्तक घेत आहेत. याही वर्षी त्यांनी दोन बिबटे दत्तक घेतले. गेल्या वर्षी त्यांनी भीम नावाचा बिबट्या दत्तक घेतला होता. मात्र त्याचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे त्यांनी यंदा दोन बिबटे दत्तक घेतले असून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.
 
पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग संवर्धनासाठी आणि प्राणीप्रेम जोपासण्याचा संदेश देण्यासाठी आपण बिबट्या दत्तक घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निसर्ग साखळी टिकविण्यात बिबट्याची महत्वाची भूमिका असते. माझे नेतृत्व भारतीय दलित पँथर मधून पुढे आले आहे.अमेरिकेत जशी ब्लॅक पँथर तर तशी भारतात दलित पँथर ही संघटना होती.दलित पँथर पासून आम्हाला पँथर बद्दल विशेष प्रेम असल्यामुळे पँथर दत्तक घेतला. या पँथरचे नाव सिंबा ठेवण्यात आले आहे. अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली.