सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (07:52 IST)

बाप्परे,रेल यात्री वेबसाइटवरुन तब्बल सात लाख पॅसेंजरचा डेटा लीक

रेल यात्री या वेबसाइटवरुन तब्बल सात लाख पॅसेंजरचा डेटा लीक झाला आहे. सेफ्टी डिटेक्टिव्स या सायबर सिक्योरिटी फर्मने डेटा लीकबद्दल माहिती काढली. रिसर्चर्स म्हणाले की १० ऑगस्ट रोजी अनसिक्योर्ड सर्वरबद्दल माहिती मिळाली. त्यामध्ये ४३ GB डेटा होता.
 
रिपोर्ट्सनुसार रेल यात्री या साइटवरुन चुकून सात लाख प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. यामध्ये डेबिट कार्ड, यूपीआय डेटा आणि खासगी माहिती लीक झाली आहे. खासगी माहितीमध्ये (पर्सनल इन्फ़ॉर्मेशन) यूजर्सचं नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आणि डेबिट कार्ड क्रमांकाचा समावेश आहे. नेक्स्ट वेबच्या एका रिपोर्ट्सनुसार रेल यात्री वेबसाइटने यूजर्सचा डेटा एका सर्वरमध्ये ठेवला होता. हे सर्वर सुरक्षित नव्हतं.
 
दरम्यान, रेल यात्री या वेबसाइटने डेटा लीकच्या बातमीचं खंडन केलं आहे. अशा प्रकारचा कोणताही डेटा लीक न झाल्याचं त्यांनी सांगितलं.