मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (16:36 IST)

हृदयविकाराच्या त्रासामुळे रामविलास पासवान रुग्णालयात

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना रविवारी रात्री दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पासवान यांना पहिल्या पासूनच हृदयविकाराचा त्रास आहे. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्यांच्या कोरोना टेस्टबाबत काहीही समोर आले नाही आहे. तसेच सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.  
 
रामविलास पासवान हे केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री आहेत. याशिवाय ते बिहारच्या लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्षही आहेत. रामविलास पासवान गेल्या ३२ वर्षात ११ निवडणुका लढले असून त्यातील ९ वेळा जिंकले आहेत. याशिवाय रामविलास पासवान यांनी सहा पंतप्रधानांसोबत काम केले आहे, हा एक स्वतःच अनोखा विक्रम आहे.