CJP आंदोलन; दिल्लीत रेल्वे-मेट्रो-इंटरनेट बंद
दिल्लीतील प्रस्तावित आंदोलने आणि वाहतूक सूचनेमुळे, नवी दिल्ली, टिळक ब्रिज आणि हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या ४५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहे तसेच याव्यतिरिक्त, १७० पॅसेंजर गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहे.
दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विविध ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले असून, ४५ मेट्रो स्थानकेही बंद करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवरून ये-जा करणाऱ्या २०० हून अधिक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहे. या ४५ गाड्यांमध्ये अनेक प्रीमियम, सुपरफास्ट, एक्सप्रेस आणि मेल गाड्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीहून ये-जा करणाऱ्या १७० पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
तसेच कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी जनपथ-कर्तव्य पथ चौकाच्या चार किलोमीटरच्या परिसरात २४ तासांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. ही बंदी ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत लागू राहील. दरम्यान, दिल्ली मेट्रोच्या ५७ स्थानकांचे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे बंद ठेवण्यात येतील आणि ६० हून अधिक गाड्या रद्द केल्या जातील.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) तैनाती वाढवण्यात आली आहे. मेट्रो स्थानके बंद करणे आणि गाड्या रद्द करणे यांसारख्या निर्बंधांची आवश्यकता आणि प्रमाणबद्धतेवर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोबाइल इंटरनेट सेवांच्या निलंबनाचा दिल्लीतील अनेक प्रमुख भागांवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये कनॉट प्लेस, मंडी हाऊस, प्रगती मैदान, गुरुद्वारा बंगला साहिब, बाराखंबा रोड, खान मार्केट, लोधी रोड आणि जांगपुराचा काही किंवा संपूर्ण भाग यांचा समावेश आहे. या निर्बंधांमुळे या भागांतील रहिवासी, व्यावसायिक आणि अभ्यागतांना मोबाइल इंटरनेट वापरताना अडचणी येऊ शकतात.
