शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

खाऊच्या पैशातून त्यांनी मैत्रिणीला दिली व्हीलचेअर

जयपूर- श्री गंगासागर जिल्ह्यात असलेल्या एका खासगी शाळेतील दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनींनी खाऊच्या पैशातून वर्गातील मैत्रिणाला व्हीलचेअर भेट देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण घालून दिला आहे.
रिदमलसार येथील इंग्लिश मॉर्डन स्कूलमधील दुसरीच्या वर्गात उषा शिक्षण घेत आहे. पायाने अपंग असल्यामुळे तिला वावरणे अवघड जात होते. शिवाय, तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. ख्याती या विद्यार्थिनीने याबाबतची माहिती आपल्या आजोबांना दिली. आजोबांनी नातीला विचारले की तुझ्या पिगी बँकेत किती पैसे आहेत? अन् हे पैसे तू त्या मैत्रिणाला देऊ शकतेस का? नातीनेही तात्काळ होकार दिला परंतू हे पैसे कमी पडणार होते. 
 
याबाबतची माहिती वर्गातील इतर विद्यार्थिनींना दिली. विद्यार्थिनींनीसुद्धा होकार देत खाऊचे पैसे एकत्र गोळा केले अन् व्हीलचेअर खरेदी केली. शाळेमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमादरम्यान उषाला व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी उषाच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहत होतं.