आता गायकवाड यांचे एअर इंडियावर ताशेरे म्हणे सेवा खराब आहे
विमानात जागेवरून भांडण करत असभ्य भाषेत शिव्या देत कर्मचारी वर्गाला मारहाण करत असलेल्या खासदार गायकवाड यांनी आता आपला सूर बदलला असून त्यांनी एअर इंडियावर ताशेरे ओढले असून म्हणे सेवा खराब आहे असे बोलत आहेत. त्यांच्यावर चौफेर बाजूने टिका होत असून ते अजूनही समोर आले नाहीत.तर उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी लेखी स्पष्टीकरण दिलं आहे.
माझा बिझनेस किंवा इकॉनॉमी क्लासबद्दलचा आग्रह नव्हता, तर एअर इंडियाद्वारे मिळणाऱ्या गलिच्छ सेवेबद्दलचा होता. तसंच माध्यमांतून एकच बाजू दाखवली जात असून, एअर इंडियाकडून दिशाभूल करण्यात येत आहे, असं खासदार रवींद्र गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता इतक्या दिवस कर्मचारी आणि तिकिटावर बोंब मारत असलेल्या खासदार यांनी अचाकन घुमजाव केले आहे.त्यामुळे ते अजून अडचणीत सापडले असून सर्व विमान कंपन्यांनी त्यांना विमान बंदी केली आहे.