शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (10:08 IST)

आरबीआयकडे पाठविल्या 7 कोटी रुपये किमतीच्य नोटा

नाशिक येथील असलेल्या  सिक्युरिटी प्रिटिंग प्रेसमधून नवीन छापलेल्या आणि नवीनतम अश्या  पाचशे, शंभर आणि वीस  रुपयांच्या एकूण  7 कोटी 40 लाख नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवल्या आहेत. तर  या  सर्व नोटांची एकूण किंमत एक हजार कोटी आहे.
 
देशात केंद्राने पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून केल्या आहेत. त्यामुळे व्यवहार करताना  चलनाचा मोठा  तुटवडा निर्माण झाला होता. त्या करीता  नव्याने नोटा छापल्या आहेत. यामध्ये  छापण्यात आलेल्या  पाचशे रुपयाच्या 1.3 कोटी, शंभर रुपयांच्या 3.1 कोटी, तर वीस रुपयांच्या 3 कोटी नोटांचा समावेश आहे.
 
देशातील नऊ सिक्युरिटी प्रिटींग प्रेसपैकी नाशिक सुद्धा प्रमुख केंद्र आहे. तर यामध्ये  दोन दिवस म्हणजेच  सोमवार आणि मंगळवारी अशा दोन टप्प्यात छापून  या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आल्या आहेत. नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरु आहे. चलन तुटवड्यामुळे सध्या देशभरात नागरिकांचे मोठे हाल सुरु आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या हाती नव्या नोटा आल्या नाहीत, त्यांना त्रास सहन करावा लागतोय. याचे पडसाद उमटतानाही दिसत आहेत. त्यामुळे नाशिक येथून विशेष सुरक्षेत नवीन छापील नोटा लगेच पाठवल्या आहेत.