बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

स्वामी ओम यांना दहा लाखांचा दंड

बेताल विधानांनी वाद निर्माण करणारे स्वामी ओम यांना सुप्रीम कोर्टाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. देशाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला होता. दीपक मिश्रा यांची ही नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा स्वामी ओम यांनी कोर्टात केला होता. दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीवर स्वामी ओम यांनी केलेली याचिका कोर्टाने तातडीने फेटाळून लावली. याशिवाय, फक्त लोकप्रियेतेसाठी ही याचिका केल्याचे म्हणत 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
 
दुसरीकडे स्वामी ओम यांनी आपल्याकडे एकही रुपया नाही, त्यामुळे मी दंड भरु शकत नाही, असं म्हटलं. त्यावर, तुमच्याकडे 34 कोटी अनुयायी असल्याचा दावा करता, मग त्यांच्याकडून एक-एक रुपये जरी घेतला, तरी दंड भरु शकाल, असं कोर्टाने सुनावले आहे.