मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (11:46 IST)

सपाचे ज्येष्ठ नेते आझम खानची 814दिवसांनंतर तुरुंगातून सुटका

Senior SP leader Azam Khan released from jail after 814 days सपाचे ज्येष्ठ नेते आझम खानची 814दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
आजम खान 27 महिन्यांनंतर सीतापूर कारागृहातून बाहेर आले आहेत. काल म्हणजेच 19 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. रात्री उशिरा त्यांच्या सुटकेचे आदेश सीतापूर कारागृहात पोहोचले. सुटकेनंतर आझम यांचे तुरुंगाबाहेर शिवपाल सिंह यादव, त्यांची दोन मुले आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी स्वागत केले. सपाचे माजी आमदार अनूप गुप्ता यांच्या घरी अल्पोपहारानंतर त्यांचा ताफा रामपूरकडे रवाना झाले  आहे. 
 
आझम खान यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रामपूरमध्ये त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी होत आहे. सीतापूर ते रामपूर या मार्गावर आझम यांच्यासह त्यांच्या दोन मुलांसह समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे.