सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 7 जानेवारी 2019 (08:55 IST)

‘पटक देंगे’ आव्हानाला शिवसेनेकडून प्रतिआव्हान

आता होऊन जाऊ द्या! शिवसेना अंगावर येणार्‍याला शिंगावर घ्यायला तयार असतेच. हा महाराष्ट्र तुम्हाला आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया देत शिवसेनेने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘पटक देंगे’ आव्हानाला प्रतिआव्हान दिले. 
 
शिवसेनेच्या प्रसिद्धी कार्यालयातून हर्षल प्रधान यांनी शिवसेनेची ‘अधिकृत प्रतिक्रिया’ माध्यमांकडे रात्री पाठवली ती शब्दश: अशी आहे-भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे. दुसरीकडे  आता भाजप नेत्यांच्या जीभा ही सरकू लागल्या आहेत. पाच  राज्यांच्या निकालानंतर भाजपचे अवसान गळले आहे..