मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 28 नोव्हेंबर 2018 (08:13 IST)

केरळमध्ये 'या' चॅलेंजने धूम उडवली

kocchi
सध्या सोशल साईटवर ‘Rain Rain Come Again’. Nillu Nillu या चॅलेंजने धूम उडवली आहे. केरळमध्ये गल्लीबोळात तरुण समोरून येणाऱ्या गाड्यांना अडवून त्यांच्यासोबर डान्स करताना दिसत आहेत. हे चॅलेंज 2004 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटावरून प्रेरित आहे. या चित्रपटात ‘Rain Rain Come Again’. Nillu Nillu असे गाणे होते. या गाण्यावरच हेल्मेट घातलेले तरुण हातात फांद्या घेऊन गाड्यांना अडवत त्यांच्यासमोर डान्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दाक्षिणात्य अभिनेता विष्णु उन्नीकृष्णन यानेदेखील हा चॅलेंज पूर्ण केला आहे.
 
सुरक्षिततेच्या दृष्टीने हा चॅलेंज धोकादायक असून यामुळे रस्ते दुर्घटना होण्याची शक्यताच अधिक आहे. यामुळे नागरिकांनी हा चॅलेंज स्वीकारणे व्हा एखाद्याला देणे तातडीने बंद करावे, असे आवाहन केरळ पोलिसांनी जनतेला केले आहे.