मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (08:01 IST)

शिवसेना पश्चिम बंगालची विधानसभा निवडणुक लढवणार

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणुक शिवसेना लढवणार आहे.  याबाबतची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत लवकरच पश्चिम बंगालचा दौरा करणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिसेना पक्ष प्रमुख यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय झाला असल्याचे संजय राऊत यांनी ट्विट करत दिले आहे. 
 
या निवडणुकीत भाजप, तृणमूल कांग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवेसंची पार्टी एआयएमआयएम हे राजकीय पक्ष निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये आता शिवसेनाही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली आहे.