मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (15:36 IST)

धक्कादायक ! 15 वर्षीय आईने 40 दिवसांच्या निष्पाप जीवाचा खून केला

मध्यप्रदेशातील दमोह येथे तेन्दुखेडा गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.एका 15 वर्षाचा मुलीने आपल्या 40 दिवसाच्या निष्पाप जीवाचा दोरीने गळा आवळून खून केला. या अल्पवयीन आईला अटक करून तिला बालसुधार गृहात पाठविण्यात आले आहे . दमोहतील तेन्दुखेडा गावातील एका 15 वर्षाची अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने बलात्कार केला .त्यापासून ती गरोदर झाली. कुटुंबियांना बलात्काराचे समाजतातच त्यांनी आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवली आणि आरोपी अल्पवयीन मुलाला अटक करून बाळ सुधार गृहात पाठवले. नंतर मुलीने एक मुलाला जन्म दिला. या अल्पवयीन आईने आपल्या 40 दिवसाच्या बाळाचा दोरीने गळा आवळून खून केला नंतर कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये म्हणून बाळाला घेऊन रुग्णालयात गेली .पोलिसांना अकस्मात मृत्यूचा संशय आल्यामुळे बाळाचं शवविच्छेदन करण्यात आलं त्यात बाळाचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समजले. पोलिसांनी आरोपी आईची कसून चौकशी करून तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन आईला ताब्यात घेऊन बाल  सुधारगृहात पाठवले आहे.