पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या दुकानदाराला सुरक्षा, सीआरपीएफ जवान तैनात
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींना झालमुरी देणाऱ्या विक्रम शॉ यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या आणि बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचा दावा केला आहे. या तक्रारीनंतर त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालमुरी देणाऱ्या विक्रम शॉ यांनी शनिवारी दावा केला की, त्यांना जीवे मारण्याच्या आणि बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले.
विक्रम काय म्हणाले?
विक्रम शॉ म्हणाले की, त्यांना धमकीचा फोन आला होता. त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस ठाण्यात दिली आणि त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ते म्हणाले, "मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मला धमकीचा फोन आला होता. माझ्या सुरक्षेसाठी मला सुरक्षा पुरवण्यात आली आहे."
विक्रम शॉ यांना व्हॉट्सॲपद्वारे धमकीचे संदेश मिळाले होते. एप्रिलमध्ये झाडग्राम येथील निवडणूक रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झालमुरी दिल्यानंतर या कथित धमक्या समोर आल्या.
Edited By- Dhanashri Naik