रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 12 मार्च 2024 (16:56 IST)

सिद्धू मुसेवालाची आई देणार जुळ्यांना जन्म

दोन जुळ्या मुलांना जन्म देणार सिद्धू मुसेवालाची आई असल्याचं सांगण्यात येत आहे. आईवडिल सिद्धु मुसेवालाच्या हत्येनंतर अगदीच एकटं पडल्याचं म्हटलं जात होतं. म्हणून दोघांनीही पालक होण्याचा निर्णय IVF च्या माध्यमातून घेतला होता. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांना गेल्या महिन्यात एक आनंदाची मिळाली. चरण कौर गर्भवती असून मार्च महिन्यात बाळाला जन्म देणार असल्याचं वृत्त आलं होतं. तसेच त्या सिद्धू मुसेवालाची आई असून त्या ५८ वर्षांच्या आहेत. चरण कौर या जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिद्धूच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आई-वडिलांसाठी सिद्धू मुसेवाला हा एकुलता एक मुलगा होता. सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. चमकौर सिंह सिद्धू मुसेवालाचे काका असून यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर गर्भवती राहिल्या आहेत. सध्या मुसेवाला कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सिद्धूच्या आईला चंडीगढमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्या दोन जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचं सांगितल जात आहे.  

Edited By- Dhanashri Naik