Sindhu Border Murder Case: सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक, इतर 2 जणांनी आत्मसमर्पण केले

arrest
Last Modified रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (11:39 IST)
सोनीपत/अमृतसर हरियाणाच्या सोनीपतमध्ये, सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी एका दलित मजुराला मारल्याच्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली, तर इतर दोन आरोपींनी सोनीपत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याचवेळी, मृतांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांच्या अमानवीय केलेल्या या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मृतक लखबीर सिंगचे अंतिम संस्कार कुटुंबीयांच्या उपस्थितीत पंजाबच्या तरण तारन जिल्ह्यातील गावात कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान करण्यात आले . लखबीरच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अंतिम अरदास साठी
तेथे कोणताही ग्रंथी उपस्थितनव्हते, किंवा त्याच्या गावी चीमा कलांमधील कोणीही अंत्यसंस्काराला उपस्थित झाले नाही .

हे अमानवीय निर्घृण हत्याकांड घडवल्याबद्दल सरबजीत सिंगला शुक्रवारी अटक करण्यात आली. सरबजीतला आज हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील न्यायालयात हजर करण्यात आले जेथे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
काही तासांनंतर अमृतसर ग्रामीण पोलिसांनी अमृतसर जिल्ह्यातील अमरकोट गावातून दुसरा आरोपी नारायण सिंह याला अटक केली. या निर्घृण खून प्रकरणात, इतर दोन लोकांनी शनिवारी संध्याकाळी उशिरा सोनीपत पोलिसांसमोर कुंडलीमध्ये आत्मसमर्पण केले. दोघेही पंजाबमधील फतेहगड साहिबचे रहिवासी आहेत.

अटकेपूर्वी नारायण सिंह यांनी अमरकोट गुरुद्वारामध्ये अरदास केली आणि यावेळी काही लोकांनी त्यांना फुले आणि नोटांचा हार घालून त्यांचा सन्मान केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरबजीत सिंगने या निर्घृण हत्येत आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचा दावा केला होता. यानंतर, दिल्लीच्या सीमेवरील निषेध स्थळे रिकामी करण्याची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेथे केंद्र सरकारचे तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून शेतकरी आंदोलन करत आहेत.

शेतकरी नेत्यांनी मात्र या घटनेचा त्यांच्या आंदोलनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, निषेधाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून आणि अधिक स्वयंसेवक तैनात करून सुरक्षा आणखी मजबूत केली जाईल.
पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील मजूर लखबीर सिंगचा मृतदेह शुक्रवारी सिंगू सीमेवर बॅरिकेड्सला बांधलेला आढळला. त्याचा एक हात कापला गेला होता आणि त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या अनेक खुणा होत्या.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू
सूरजपूर. छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये आपल्याच शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याला दारू पाजणे एका ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता सुनिश्चित करण्याच्या सूचना
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना पॉझिटिव्ह,ट्विट करून दिली माहिती
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द सीएम अशोक गेहलोत ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली नाही साथ...
मैत्रीचं नातं अत्यंत पवित्र असतं. पुराणकथांमधील कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीपासून ते विविध ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपतीनीही चिंता व्यक्त केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात ...