शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

श्रीनगरमध्ये मोर्चाला हिंसक वळण

श्रीनगर- श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले असल्याचा दावा मोर्चातील विद्यार्थ्यांनी केला आहे. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे.
 
पुलवामा महाविद्यालयाबरोबर पोलिस चौकी लावण्यास विद्यार्थ्यांवर विरोध केला होता. त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. या लाठीमारमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते. या लाठीमारच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्यातवीने मोर्चा काढण्यात आला. मात्र, त्याला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. प्रत्युत्तरात विद्यार्थ्यांनी दगदफेक सुरू केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारविरोधात काश्मीर खोर्‍यात सर्व महाविद्यालये बंद ठेवण्याची हाक देणयात आली आहे.