1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (15:15 IST)

तिसऱ्यांदा सुशांतच्या घरी पोहोचली CBI ची टीम

ssr case
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरी पुन्हा एकदा सीबीआयची टीम दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास सीबीआयची दोन पथकं वांद्रे येथील कार्टर रोड येथील माऊंट ब्लॅक या इमारतीतील सुशांतच्या घरात पोहोचली आहेत.

सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, सुशांत राहात होता त्या इमारतीतील रहिवाशांची चौकशी होणार आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येचे पुन्हा एकदा नाट्य रुपांतर केलं जाईल, असंही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सुशांतच्या घरी सीबीआयच्या टीम तिसऱ्यांदा दाखल झाल्या आहेत. या आधी दोन वेळा सीबीआयच्या टीम सुशांतच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी सुशांतच्या इमारतीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्शनची तपासणी करण्यात आली होती. तसेच सुशांतच्या बेडरुममध्ये त्याच्या आत्महत्येचं नाट्य रुपांतरही करण्यात आलं होतं.