1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 मे 2025 (15:57 IST)

दिल्ली : वादळ आणि पावसामुळे १० जणांचा मृत्यू, रेड अलर्ट जारी

delhi rain
शुक्रवारी सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये अचानक हवामान बदलले आणि जोरदार वादळासह मुसळधार पाऊस सुरू झाला. सकाळपासून जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे राजधानी आणि आसपासच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळ, वीज पडणे आणि झाड पडण्याच्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी ४ आणि छत्तीसगडमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात अनेक भागात पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हवामान खात्याने दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. 
Edited By- Dhanashri Naik