शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2017 (09:03 IST)

सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका दाखल करता येणार

सुप्रीम कोर्टात आता ऑनलाईन याचिका दाखल करता येणार आहे. सुप्रीम कोर्टात इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन याचिका आणि कागदपत्र दाखल करण्याच्या सुविधेचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. या कार्यक्रमावेळी सरन्यायाधीश जेएस खेहर यांच्यासोबतच सुप्रीम कोर्टातील अनेक न्यायाधीश उपस्थित होते. आता देश बदलू लागला आहे, सुट्टी असूनही आपण काम करत आहोत. सुप्रीम कोर्टानं या सुविधेच्या माध्यमातून आधुनिकतेच्या दिशेनं एक पाऊल टाकलं आहे. सरन्यायाधीश आणि सर्व न्यायाधीशांना मी याप्रसंगी शुभेच्छा देतो, असं पंतप्रधान मोदींनी लोकार्पण सोहळ्यवेळी म्हटलं आहे.