शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तेलंगणचे मुख्यमंत्रीद्वारे तिरूपतीला 5 कोटींचे दागिने अर्पण!

विजयवाडा- तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव प्रसिद्ध तिरूपती मंदिरात 5 कोटी रूपये किंमतीचे दागिने चढवणार आहेत. याबाबत प्रसिद्ध झालेल्या तेलंगण हे स्वतंत्र राज्य स्थापन व्हावे यासाठी चंद्रशेखर राव यांनी भगवना व्यंकटेश्वराला नवस केला होता.
 
मुख्यमंत्री झाल्यानंतर राव यांची व्यंकटेश्वराच्या मंदिराला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. राव आपला नवस फेडताना जे दागदागिने अर्पण करणार आहेत त्या दागिन्यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या दागिन्यांमध्ये हिर्‍यांनी मढवलेल्या सोन्याच्या शालीग्राम हरम चा समावेश आहे. शिवाय मकर कंठी आणि इतर अनेक दागिन्यांचा समावेश आहे.