बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (11:57 IST)

तेलंगणा : ट्रेन मध्ये चढताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू

death
तेलंगणातील महबूबाबाद रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना हृदय विकाराचा झटका येऊन एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रामबाबू असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. 

रेलवे मध्ये चढताना रामबाबू नावाचा व्यक्ती खाली पडला आणि त्याला हृदय विकाराचा झटका आला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयत व्यक्ती ट्रेनमध्ये कुठे जात होते ते अद्याप माहिती नाही. 

तेलंगणातील महबूबाबाद रेल्वे स्थानकावर ट्रेन मध्ये चढत असताना व्यक्ती खाली पडून त्याचा मृत्यू झाला. त्याला हृदय विकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये ही व्यक्ती बेशुद्ध झाली असून त्याला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
 
Edited By- Priya Dixit