गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (19:46 IST)

भीषण अपघात बस पुलाला धडकली, 12 जण ठार, अनेक जखमी

राजस्थानमधील सीकरमध्ये भीषण अपघात झाला. सालासरकडून येणारी बस कल्व्हर्टला धडकली. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. लक्ष्मणगढजवळ हा अपघात झाला.या अपघातात 40 जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.लक्ष्मणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मणगड येथून दुपारी दोन वाजेच्या सुमारास सालसरकडून येणारी खासगी बस नियंत्रणाबाहेर जाऊन पुलावर आदळली आणि अपघातग्रस्त झाली.या अपघातात 12 जण ठार झाले. 

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातावर शोक व्यक्त करत जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट केले, "सीकरच्या लक्ष्मणगढ भागात झालेल्या बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानी अत्यंत दुःखद आणि ह्रदयद्रावक आहे. मृतांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत."

अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले.
Edited By - Priya Dixit