शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (15:47 IST)

केस गळतीने त्रस्त मुलीची आत्महत्या

कोणत्या कारणांमुळे कधी कोणाला नैराश्य येईल आणि त्यातून अगदी आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेतात. याबाबत हल्ली कोणताही अंदाज बांधता येत नाही. असाच एक मन हादरवणारी घटना म्हैसूर येथे घडली असून, मुलीने हेअर स्टाइलमध्ये बदल केल्यानंतर केसगळतीची समस्या सुरू झाली.  निराश झालेल्या म्हैसूरमधील एका विद्यार्थिनीनं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केलीय.  
 
आत्महत्या करणारी विद्यार्थिनी बीबीए शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिनं म्हैसूरमधील एका पार्लरमधून हेअर स्टाइलमध्ये बदल केला होता. मात्र तिला या नंतर केसगळतीची समस्या निर्माण झाली. तिला असे वाटले की एकही केस राहणार नाही की काय?, अशी भीती तिला रोज भेडसावू लागली. केसगळतीच्या समस्येमुळे ती निराश झाली आणि चक्क तिनं जीवनयात्राच संपवली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांनी पार्लरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हेअर ट्रिटमेंटमुळे त्वचेची अॅलर्जीदेखील झाल्याचा आरोप नेहाच्या आईनं केला आहे. त्यामुळे कोणतीही उपचार घेताना योग्य माणसाकडून घेतले पाहिजे आणि आपल्याला होणारा त्रास इतरांना सागितला पाहिजे नाहीतर आपण एकटे आहोत असे चित्र समोर येते आणि निराशा येते.