गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2024 (14:38 IST)

खोलीमध्ये मिळाला आईचा मृतदेह, जवळ बसून रडत होता अडीच वर्षाचा चिमुकला

दिल्लीमध्ये एक भयानक घटना समोर आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या राजोकारी मध्ये एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा गाला दाबून हत्या केली आहे. यानंतर आरोपी फरार झाला. अडीच वर्षाचा चिमुरडा आईच्या मृतदेहा जवळ बसून रडत होता. चिमुरड्याच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारच्या घरात पहिले तर त्यांना भयानक दृश्य दिसले. शेजारच्यांनी लागलीच पोलिसाना सूचना दिली. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी आरोपीला पंजाबच्या मोहालीमधून ताब्यात घेतले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी त्यांना फोन आला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचली व मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीने पहाटेच त्याच्या पत्नीचा गाला दाबून हत्या केली. तसेच अडीच वर्षाचा चिमुरडा आईच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता. सांगितले जाते आहे की, यावर्षी एप्रिल मध्ये त्यांनी लग्न केले होते. दोघांचे दुसरे लग्न होते. आरोपीला पहिल्या पत्नीपासून आपत्य नव्हते. जेव्हा की मृत महिलेला एक अडीच वर्षाचा मुलगा आहे . चौकशी दरम्यान समोर आले की, भांडणामध्ये राग अनावर झाल्याने या आरोपीने महिलेचा गळा दाबला व तिची हत्या केली. क्राईम टीम ने घटनास्थळी पाहणी केली व पुढील तपास पोलीस करीत आहे

Edited By- Dhanashri Naik