गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (17:25 IST)

सिंधुताईंसाठी राष्ट्रपती पायऱ्या उतरुन खाली आले

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्‍या पद्म पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिध्द उद्योजक रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्यासह अन्य तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. अनाथांची माय म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी पुरस्कार स्विकारला. त्यावेळी, राष्ट्रपती कोविंद हे आपल्या खुर्चीवरुन पायऱ्या उतरुन खाली आले.