गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (17:58 IST)

रेल्वे पकडताना दाम्पत्य एक्स्प्रेसखाली आले पण....

1 नोव्हेंबरच्या सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकामध्ये चालत्या एक्स्प्रेस गाडीत चढण्याच्या प्रयत्नात हात सुटल्याने पती-पत्नी गाडी खाली गेल्याची घटना घडली. प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ एक्सप्रेसमधील गाडी थांबवण्याची चैन खेचल्याने गाडी लगेच थांबली. सुदैवाने हे दोघेही सुखरुप बचावले. गाडी थांबली तेव्हा हे पती पत्नी फलाटाच्या भिंतीचा आसरा घेऊन अंग चोरुन बसल्याचं दिसलं. प्रवासी आणि टीसीच्या मदतीने एक्स्प्रेस खाली अडकलेल्या या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.