1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (14:22 IST)

दुकानाच्या ट्रायल रूम मध्ये अजगर शिरला

The python  entered the trial room of the shop Marathi National News  In Webdunia Marathi
लोक कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात जातात आणि घरी घेऊन येण्याआधी त्याचे ट्रायल घेतात. आणि व्यवस्थित असल्यावर ते घरी घेऊन येतो. पण एका दुकानाच्या ट्रायल रूममध्ये चक्क अजगर शिरल्याने खळबळ उडाली. ट्रायल रूमचे छत तोडून हा अजगर आत शिरला होता. तो तिथे कसा आला हे अद्याप कळू शकले नाही. तो अजगर त्या ट्रायल रूम मधून बाहेर पडतच नव्हता. त्याने रेस्क्यू टीम वर हल्ला केला. रेस्क्यू टीमच्या सदस्यानी त्याला बाहेर काढले तेव्हा तो चिडला आणि त्याने समोरच्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 
ज्या बिळात अजगर लपून बसला होता. त्यातून त्याला काढायला खूप प्रयत्न करावे लागले. 
 
कपड्यांमधून तो छताच्या आत कधी शिरला हे कळलेच नाही. अजगर असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. रेस्क्यू टीम ताबडतोब घटनास्थळी पोहोचली तेव्हा हा अजगर त्यांना छताच्या बिळात बसलेला दिसला.  छत तोडल्यावर त्यांना जे दिसले ते पाहून ते थक्कच झाले. त्यांना आपल्या डोळ्या समोर मोठा अजगर दिसला. अजगर चिडलेला दिसत होता जणू तो एखाद्याला गिळेलच. त्याने रेस्क्यू टीमच्या सदस्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रेस्क्यू टीम ने त्याला ओढून खाली पाडलं.तो अजगर खूप आक्रमक झाला होता. तो तोंड उघडून हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता.