रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (15:18 IST)

छत्तीसगडच्या जिल्ह्या रुग्णालयात 7 नवजात मुलांचा दुर्देवी मृत्यू,नातेवाईकांनी गदारोळ केला

रायपूर. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जिल्हा रुग्णालयात 7 नवजात मुलांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालयात दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गदारोळ केला.
 
प्रकृती बिघडल्यामुळे या मुलांना ऑक्सिजनविना दुसर्‍या रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. रुग्णालयातून एका पाठोपाठ 7 नवजात मुलांचे मृतदेह आणले गेले.
 
आरोग्य अधिकाऱ्यांनी डॉक्टरकडे संपूर्ण घटनेची माहिती मागितली आहे. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.