मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही

महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चाच झाली नसल्याचं पवार यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.

राज्यातल्या एकदंर राजकीय स्थितीबाबत सोनिया गांधी यांना आपण माहिती दिली. परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संयुक्त् पुरोगामी आघाडीतल्या इतर घटक पक्षांशीही चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज कॉंग्रेस सोबत चर्चा होणार म्हणून राज्यातील सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. मात्र यांनी या प्रश्नातील हवाच काढून टाकली आहे. त्यामुळे आता कधी सरकार स्थापन होणार असा परत एकदा असा प्रश्न निर्माण झाला आहे.