गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विजय रुपाणी दुसऱ्यांदा बनले गुजरातचे मुख्यमंत्री

गुजरात विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्‍यानंतर भाजप सरकारचा आज शपथविधी होणार आहे.

या शपथविधीत विजय रूपानी दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

यांनी घेतली शपथ..

विजय रुपाणी

नितीन पटेल

आर.सी. फलदू

भुपेंद्र चुडासमा

कौशिक पटेल

सौरभ पटेल

गणपत वसावा

जयेशभाई रादडिया

दिलीप ठाकूर

ईश्वर परमार

प्रदीपसिंह जाडेजा

परबत पटेल

पुरुषोत्तम सोलंकी

बचूभाई खाबड


कॅबिनेटमध्ये असतील हे चेहरे
- विजय रूपाणी, नितिन पटेल, कौशिक पटेल, आरसी. फलदू, गणपत वसावा, प्रदीप जडेजा, सौरव पटेल, बाबुभाई बोखिरिया, दिलीप ठाकोर, जय रादडिया, भूपेंद्र सिंह चुडास्मा

 

या सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. गांधीनगरमधील सचिवालय इमारतीशेजारील पटांगणावर हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजप व ‘रालोआ’घटकपक्षांचे १८ मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या मंत्रीमंडळामध्ये पाटीदार समाजातील सहा आमदारांचाही समावेश करण्यात आला आहे. अशी घटना प्रथमच होत आहे. याशिवाय, उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रातील ३० मंत्री यांचीही हजेरी असणार आहे.

 
गुजरातमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी यांनी राज्‍यपाल ओ. पी. कोहली यांच्याशी चर्चा करून सक्षम सरकार स्‍थापण्याचा औपचारिक दावा केला. त्‍यानुसार मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अन्य मंत्री यावेळी शपथ घेतील. राज्यपाल कोहली त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. विजय रुपानी यांच्याच मागील सरकारमधील काही वरिष्‍ठ नेत्‍यांना यावेळीही मंत्रीमंडळात स्‍थान देण्यात आले आहे. कॅबिनेटसाठी भूपेंद्र सिंह चूडासमा, कौशिक पटेल, गणपत वसावा, दिलीप ठाकूर, बाबूभाई बोखिरिया आणि प्रदीपसिंह जडेजा यांच्या नावाची चर्चा आहे.