पाळीव मांजराने चावा घेतल्यामुळे बाप -लेकाचा दुर्देवी मृत्यू
अनेकांना घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. ते कुत्रा, मांजर पाळतात. आणि त्यांची काळजी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे घेतात. त्यांच्यावर प्रेम करतात. आपण अनेकदा पाळीव कुत्र्यानेच मालकावर हल्ला केल्याच्या घटना ऐकतो.पण पाळीव मांजराने चावा घेतल्यामुळे पिता पुत्राचा रेबीजचे इन्फेक्शन होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील कानपूर येथे घडली आहे. इम्तीयाजुद्दीन आणि अझीम असे या पिता पुत्राची नावे आहेत.
सदर घटना उत्तरप्रदेशातील कानपूरच्या अकबर कोतवाली परिसरातील अशोक नगरची आहे. येथे राहणारे इम्तियाज हे एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांनी आपल्या घरात एक मांजर पाळली होती. या मांजरीला एका भटक्या कुत्र्याने चावले होते.तिच्या शरीरात रेबीजच इन्फेक्शन पसरलं. या मांजरीला दुखापत झाली आणि तिच्यावर उपचार सुरु झाला.ऑक्टोबरच्या अखेरीस या मांजरीने मुला अझीमचा चावा घेतला.
त्याच दिवशी मांजरीने वडील इम्तीयाजुद्दीनला चावले. त्यांनी या कडे फारसे लक्ष दिले नाही आणि त्यांच्या शरीरात रेबीजचे इन्फेक्शन पसरले आणि त्यांची प्रकृती हळू-हळू ढासळू लागली.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या पाळीव मांजरीचा मृत्यू झाला. त्या दोघांना रेबीजचे लक्षणे जाणवू लागले आणि ते तातडीनं डॉक्टरांकडे गेले आणि इंजेक्शन घेऊन आले.
2
4 नोव्हेंबर रोजी सर्व जण एका नातेवाईकांच्या लग्नासाठी भोपाळला गेले असता अझिमची तब्बेत ढासळू लागली. कानपूरला येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला.
घरी आल्यावर काही दिवसांनी इम्तीयाजुद्दीनची प्रकृती पण खालावली. त्यांना कानपूरच्या रुग्णालयात नेले नंतर डॉक्टरांनी त्यांना पीजीआय मध्ये दाखल केले. गुरुवारी उपचाराधीन असताना इम्तीयाजुद्दीनचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
Edited by - Priya Dixit