सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जानेवारी 2020 (16:39 IST)

कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला अटक, संपूर्ण रॅकेट झाले उद्ध्वस्त

मुंबई क्राईम ब्रांचच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत भारतात आणि विशेष करून मुंबईत खंडणीचं रॅकेट चालवणारा कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला अखेर अटक केली आहे. त्याला पाटणा येथून अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याची २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 
 
१० दिवसांपूर्वीच म्हणजे २९ डिसेंबर रोजी त्याची मुलगी सोनिया शेख हिला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली होती. आपल्या मुलीसोबत ती भारत सोडून नेपाळला पळून जात असल्याचं नंतर पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. अखेर खुद्द एजाज लकडावालालाच पोलिसांनी अटक केल्यामुळे हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना मोठं यश आल्याचं सांगितलं जात आहे.