रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

उत्तरप्रदेश, पंजाबमध्ये फेब्रुवारीत निवडणुका

नवी दिल्ली- देशामधील एकंदर राजकीय समीकरणांच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील मानल्या जाणार्‍या उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यांमध्ये येत्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत निवडणुका होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. 1 ङ्खेब्रुवारी, 2017 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर लगेचच या निवडणुका होणार आहेत. उत्तरप्रदेश वगळता पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार इतर राज्यांत एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे; तर उत्तर प्रदेशमधील निवडणूक सात टप्प्यांत होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमधील 80 लोकसभा मतदारसंघांपैकी तब्बल 70 जागा जिंकण्यात यश मिळविले होते. अशीच कामगिरी करुन राज्यामध्ये विजयी पुनरागमन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या समाजवादी पक्षाची सत्ता असून भाजप व सप या दोन्ही पक्षांना मायावती यांचा बहुजन समाज पक्ष कडवी लढत देण्याची शक्यता आहे.