सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (16:55 IST)

यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद हिसकावून सर्व परीक्षांवर बंदी घातली

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर मोठी कार्यवाही करत तिचे आयएएसचे पद हिसकावून घेतले आहे. आणि तिला भविष्यात सर्व परीक्षांवर बंदी घातली आहे. सदर माहिती खुद्द आयोगानेच दिली आहे. 

पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी मध्ये चुकीच्या पद्धतीने आरक्षण घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

आयोगाने आज दिलेल्या माहितीनुसार, नागरी सेवा परीक्षा 2022 साठी तात्पुरती शिफारस केलेल्या पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली असून तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. 

UPSC द्वारे प्रथम IAS झालेली पूजा खेडकर महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थी अधिकारी बनली होती. यावेळी त्याच्यावर लाल दिवा, व्हीव्हीआयपी क्रमांकाचे वाहन आणि खासगी वाहनात स्वत:च्या केबिनची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस झाले.
Edited By- Priya Dixit