रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (18:04 IST)

पुणे पोलिसांनी पूजा खेडकरच्या पालकांचा वैवाहिक अहवाल सरकारला पाठवला

पूजा खेडकर प्रकरणात पूजा खेडकरच्या आई वडिलांची वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने पुणे पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश दिले होते. पूजाने UPSC परीक्षेसाठी ओबीसी नॉन क्रिमी लेअरचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. या साठी केंद्र सरकारने  तिच्या पालकाची सद्य वैवाहिक स्थिती माहिती करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले असून तिच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीचा अहवाल पुणे पोलिसांनी राज्य सरकारला पाठवला असून तो केंद्राला पाठवला जाणार आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पूजाचे आई-वडील दिलीप आणि मनोरमा खेडकर हे कायदेशीररित्या वेगळे झाले होते. 

पूजा खेडकर या 2023 च्या बॅच च्या आयएएस अधिकारी होत्या. त्यांच्यावर ट्रेनी असताना त्यांना न दिलेल्या विशेषाधिकारांचा गैर वापर केल्याचा आरोप आहे. 

त्यांच्यावर गेल्या आठवड्यात चुकीची तथ्ये आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना UPSC ने 2022 च्या परीक्षेसाठी उमेदवारी रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. 
पूजा ने नॉन क्रिमी लेअर कोट्याचा फायदा घेण्यासाठी तिचे पालक वेगळे झाल्याचा दावा केला होता. ती तिच्या आईसोबत राहते असे सांगितले होते. 

नियमांनुसार, ओबीसी नॉन-क्रिमी लेयर श्रेणीचा लाभ केवळ अशाच उमेदवारांना मिळू शकतो ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.सध्या तिची आई मनोरमा खेडकर या जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला बंदुकीच्या धाकावर धमकी दिल्याप्रकरणी तुरुंगात आहे. 
 
Edited By- Priya Dixit