गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हॉटेलमध्ये पायाने मळली जात होती कणीक

नवी दिल्ली-सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आल्यावर खाद्य सुरक्षा विभागाने आपली एक टीम शहरातील प्रसिद्ध काके दा हॉटेल येथून फूड सॅम्पल एकत्र केले. या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या पायाने कणीक मळताना दिसत आहे.
 
तरी कनॉट प्लेसच्या आउटर सर्कल स्थित 86 वर्ष जुन्या या हॉटेलने आरोप नाकारत हा कट असल्याचे म्हटले आहे.
 
दिल्लीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की पायाने कणीक मळत असल्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर तेथून सॅम्पल एकत्र करण्यात आले. आता हे सॅम्पल प्रयोगशाळेत पाठवले जातील. हे प्रसिद्ध काके दा हॉटेल 1930 साली स्थापित केले गेले होते. व्हिडिओच्या सत्यतेची अजून पृष्ठी केली गेली नाहीये.
 
काके दा हॉटेलच्या कॅशियरने शंभू सिंह रावत उर्फ शिव सिंह यांनी म्हटले की ही हॉटेलला बदनाम करण्याचा कट आहे. व्हिडिओ दिसत असलेला व्यक्ती कणीक मळत नसून कपडे धुत आहे.

चित्र सौजन्य: यू ट्यूब