शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (09:05 IST)

लग्नासाठीच मुलींच किमान वय वाढणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

केंद्र सरकार लवकरच मुलींच्या लग्नाचे किमान वय बदलणार आहे. कृषी आणि अन्न संघटनेच्या (FAO) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे सांगितले. यावेळी त्यांनी 75 रुपयांचे स्मरणार्थी नाणेही जारी केले. पीएम मोदी म्हणाले, "मुलींच्या लग्नाचे योग्य वय काय असावे यावर महत्त्वाची चर्चा सुरू आहे."
 
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मोदींनी सांगितले की, त्यांना देशभरातून अनेक महिलांची पत्रे आली आहेत, ज्यात त्यांना या समितीच्या अहवालाविषयी विचारण्यात आले होते आणि सरकार या प्रकरणी कधी निर्णय घेणार आहे हे देखील जाणून घ्यायचे होते. त्यावर उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, "मी त्यांना आश्वासन देऊ इच्छितो की, समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार या विषयावर लवकरच निर्णय घेईल."
 
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात महिलांच्या लग्नाचे किमान वय किती असावे, अशी घोषणा केली होती, याबाबत सरकार चर्चा करत असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या मुलींसाठी लग्नाचे किमान वय १८ वर्षे आहे, तर पुरुषांचे किमान वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
 
खरे तर मुलींचे लग्नाचे किमान वय १८ वरून २१ पर्यंत वाढवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलींचे लग्न होण्यासाठी १८ वर्षे वय खूपच कमी आहे आणि लग्न करून मुलाची काळजी घेण्याचे वयही योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.