सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 मे 2017 (16:53 IST)

'त्या' बेपत्ता सुखोईचा अपघात , विमानाचे अवशेष सापडले

भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई एसयू 30 जेट फायटरचा अपघात झाला आहे.  तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. भारतीय हवाई दलाच्या दिमतीत असलेल्या अत्याधुनिक सुखोई लढाऊ विमानांपैकी एक विमान आसामधील चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून बेपत्ता झाले होते.  मंगळवारी नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळात सुखोई एसयू 30 जेट फायटर विमान बेपत्ता झाले होते. आसाममधील तेजपूरपासून 60 किमी अंतरावर असताना या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला होता.