काश्मिरमध्ये चकमकीत चार अतिरेकी ठार
जम्मू काश्मिरच्या सीमावर्ती भागातील कुपवाडा जिल्हात अतिरेकी व सुरक्षा रक्षकांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत पाकिस्तानातून चालवल्या जाणार्या लष्करे तोयबा च्या अतिरेक्याना ठार करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चकमक सुरू होती. अधिकृत सुत्रांनी सांगितले की राज्या पोलिस व 47 राष्ट्रिय रायफल्सच्या विशेष गट एसओजीला कुपवाडा जिल्यात अतिरेकी लपल्याचा सुराग मिळताच त्यांनी त्या भागाची नाकेवंदी केली. सुरक्षा रक्षक जसे एका निश्चत ठिकाणी पोहोचेले तेव्हा अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबारी करायला सुरूवात केली. सुरक्षा रक्षकांनी त्याला प्रत्युत्यर देण्यास सुरूवात केली. त्यात आत्तापर्यंत चार अतिरेकी ठार झाले. सूत्रांनी सांगितले की ठार झालेल्या अतिरेक्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याच्या कडून काही प्रमाणात विस्फोटकेही जप्त करण्यात आला आहे.